मुंबई | राज्यातील खाजगी शाळा आणि खास करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये होणाऱ्या फी दरवाढीसंदर्भात आज विधानपरिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राज्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात उत्तर दिलं.
ज्या शाळा कायद्याखाली आल्या नाहीत त्या शाळांचा अहवाल तपासून माहिती घेऊन कायद्याखाली आणल्या जातील. शाळांमधील शुल्कवाढीसंदर्भात ज्या शाळा, संस्था पालन करत नाहीत, त्या शाळांवर नवीन 2019 च्या सुधारणा कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
कोणत्याही संस्थेनं शुल्क वाढवलं अन् कारवाई झाली नाही असं होणार नाही. त्यासोबतच अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवला तर त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करू, असं बच्चू कडू यांनी उत्तर देताना सांगितलं.
दरम्यान, इंग्रजी माध्यमांतील शाळा त्यासोबत खाजगी शाळांमध्ये सातत्याने फी वाढ होत असल्याचा आरोप पालकांकडून केला जातो. या फी दरवाढीविरोधात पालक अनेकदा रस्त्यावरही उतरल्याचे पाहायला मिळले.
ट्रेंडिंग बातम्या-
गुजराती किड्यांची मस्ती जिरवावीच लागेल; मनसेचा आता ‘तारक मेहता’विरोधात एल्गार
“विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व केलं जातंय”
महत्वाच्या बातम्या-
गुजराती किड्यांची मस्ती जिरवावीच लागेल; मनसेचा आता ‘तारक मेहता’विरोधात एल्गार
“विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व केलं जातंय”
मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत; आता केला नवा खुलासा
Comments are closed.