Top News देश

‘रावसाहेब दानवेंना घरात घुसून मारायला हवं’; बच्चू कडू भडकले

नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे, असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. दावनेंनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू चांगलेच भडकले आहेत. दानवेंच्या वक्तव्यावर कडू यांनी संताप व्यक्त करताना दानवेंना घरात घुसून मारायला हवं, असं म्हटलं आहे.

दानवेंनी मागच्या वेळी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं तेव्हा त्यांच्या घराला आम्ही घेराव घातला होता. मात्र आता असं वाटत आहे की त्यांना घरात घुसून मारायला हवं,  अशा शब्दात बच्चू कडू यांनी दानवेंवर टीका केली आहे.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांचा डीएनए एकदा चेक करावा लागेल. त्यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावं लागेल, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोना लसीबाबत जो बायडन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

वरूण धवन आणि क्रिती सेनॉननंतर ‘या’ अभिनेत्रीला कोरोनाची लागण

रावसाहेब दानवेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

शिर्डीला जाणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

‘सोनू सूद नंबर 1’; आशियातील 50 सेलिब्रिटींमध्ये सोनू टॉप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या