सणसवाडी – शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा भ्रष्टाचार रोखला गेलाच पाहिजे. तसेच शिक्षण म्हणजे वाघीणीचे दूध आहे, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं. मात्र अलीकडे या वाघीणीच्या दुधात पाणी मिसळल्यासारखं वाटतंय, असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
वाबळेवाडीची ही ‘आंतरराष्ट्रीय ख्यातीची’ शाळा पाहण्यासाठी इंदापूर, कुडाळ, मुळशी, कल्याण आदी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून शेकडो गाड्यांतून आलेल्या शिक्षणप्रेमींना पाहून मला आश्चर्य वाटलं. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेची शाळा पहाण्यासाठी एवढी सारी लोकं दूर दूरवरून येतात. म्हणजे नक्कीच आनंदाची असल्याचंबच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
काही ग्रामीण भागातील शिक्षक गावकीच्या राजकारणात गुरफटून शाळेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गावाजवळ बदल्यांचे धोरण बदलावं लागेल, असंही कडू यांनी सांगितलं.
दरम्यान, मंत्री बच्चू कडू यांनी आदर्श शाळा वाबळेवाडी येथे भेट दिल्यावर यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार काकासो पलांडे, आमदार अशोक पवार, समता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भुजबळ उपस्थित होते.
ट्रेंडिंग बातम्या-
ज्योतिरादित्य शिंदे तो झांकी है ! सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है
काका जरा जपून…, भाजप आमदाराचा शरद पवारांना इशारा
महत्वाच्या बातम्या-
“काँग्रेसला आपले नेते सांभाळता येत नाहीत याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार”
ज्योतिरादित्य शिंदे तो झांकी है ! सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है
ज्योतिरादित्य नंतर महाराष्ट्रातला हा बडा नेता काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत?
Comments are closed.