तुरीचे पैसे रखडले, बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांसह कार्यालय ताब्यात घेतलं

तुरीचे पैसे रखडले, बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांसह कार्यालय ताब्यात घेतलं

अकोला | तुरीचे पैसे रखडल्याने आमदार बच्चू कडूंनी महाराष्ट्र स्टेट को ऑप मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्याचं कार्यालय ताब्यात घेतलं आहे. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कार्यालय आणि अधिकाऱ्यांना सोडणार नसल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय.

तूर खरेदीवरुन शेतकऱ्यांना ताप सहन करावा लागला होता, आता खरेदी केलेल्या तुरीचे पैसे मिळत नाही. अनेकदा हेलपाटे मारुन अधिकारी दाद देत नाहीत अशी शेतकऱ्यांनी तक्रार आहे.

अखेर बच्चू कडूंनी आपल्या आंदोलनांच्या अनोख्या शैलीप्रमाणे अधिकाऱ्यांसह कार्यालय ताब्यात घेतलंय. 

Google+ Linkedin