“…तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही”; बच्चू कडू यांची मोठी घोषणा

Bachchu Kadu | लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. अशात राज्यात तिसऱ्या आघाडीबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी याबाबत काही दिवसांपूर्वीच संकेत दिले होते.

अशात बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. महायुती सरकारला आम्ही 19 तारखेला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहोत.सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर माझी विधानसभा निवडणुकीतून माघार असणार आहे. माझी जागा महायुतीला देणार आहे, असं बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

बच्चू कडू यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. मी महायुतीमध्ये नाही. तुम्हाला कोणी सांगितले मी महायुतीमध्ये आहे?, असा प्रतिसवाल देखील बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलाय. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

तसंच आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू, असं म्हणत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. अधिवेशनात देखील बच्चू कडू यांनी महायुती सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यावरून घेरल्याचं दिसून आलं.

राजू शेट्टी यांचा बच्चू कडूंना युतीसाठी पाठिंबा

यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्न देखील उपस्थित केला. पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमीमधून करावी, 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांच्या शेतमालास भाव द्यावा, दिव्यांगांना दरमहिना मानधन द्यावे, या मागण्या सरकारकडे करणार आहे. त्यासाठी 19 जुलै रोजी सरकारला निवेदन देणार असल्याचं बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले आहेत.

दुसरीकडे राजू शेट्टी यांनी देखील बच्चू कडू यांना पाठिंबा दिला आहे. “मविआ आणि महायुतीकडून छोट्या पक्षांना संपवण्याचे काम सध्या सुरू आहे. लोकसभेत मला उबाठा गटाने पाठिंबा दिला नाही. आम्ही छोटे-मोठे पक्ष एकत्रित येऊन एक नंबरची आघाडी करू. बच्चू कडू हे माझे चांगले मित्र आहेत ते जर आले तर त्यांच्यासोबत आम्ही आघाडी करू.”, असं स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत.

News Title –  Bachchu Kadu Big announcement

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई, कोकणसह राज्यातील ‘या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

“माझ्यावर गुन्हा झाला तरी..”, विशाळगडावरील अतिक्रमाणाविरोधात संभाजी राजे आक्रमक

मुंबई पुन्हा तुंबणार?, पुण्यातही पावसाचं थैमान

ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट निश्चित?, सोशल मीडियावर तो व्हिडीओ व्हायरल

माझी लाडकी बहीण योजनेत नव्याने पाच मोठे बदल, अर्ज भरण्यापूर्वी एकदा वाचून घ्या!