“..तर राज्यात तिसरी आघाडी निश्चित”; बच्चू कडू यांचे महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत

Bachchu Kadu | प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मोठं वक्तव्य केलं.त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत महायुतीमधून बाहेर पडण्याचे संकेतही दिले आहेत. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता सर्वांना विधानभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.

अशात बच्चू कडू यांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पाहायला गेलं तर बच्चू कडू (Bachchu Kadu) हे सध्या महायुतीचाच भाग आहेत. मात्र, त्यांनी यापूर्वी देखील भाजपसह शिंदे गटाबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. आता तर त्यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचेच संकेत दिले आहेत.

बच्चू कडू तिसऱ्या आघाडीच्या तयारीत?

“मी शिंदे सरकारवर नाराज नाही. पण जर या सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तर मात्र आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी करावी लागेल.”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

तसंच तिसऱ्या आघाडीच्या मार्फत आम्ही 15 ते 17 जागा या विधानसभेमध्ये लढवू आणि त्या जिंकू देखील, असा आम्हाला विश्वास असल्याचं देखील बच्चू कडू म्हणाले आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अजूनही मार्गी लागले नाहीत. त्यामुळे वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यावा लागेल,असं बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले.

“..तर मी स्वतंत्र लढणार”

पुढे ते म्हणाले की, “आपण शेतकरी म्हणून विधानसभेत आलं पाहिजे. पण इथे सगळे आमदार पक्षाचे म्हणून येतात. आमचा 10 ते 15 आमदारांचा जर एखादा गट शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमी आक्रमक राहिला, तर त्यासंदर्भात चांगले निर्णय होऊ शकतात.”, असं म्हणत बच्चू कडू यांनी स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले.

“मी तिसऱ्या आघाडीचं सध्या बोलणार नाही. मी माझा स्वत:चा निर्णय घेणार. आम्ही स्वत: शेतकरी, कष्टकरी, मजूर म्हणून लोकांसमोर जाऊ. पण त्यापुर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. आम्ही मंत्रीपदाची मागणी करणार नाही. जर शेतकरी, दिव्यांगांच्या बाबतीत ते निर्णय घेणार असतील, तर आम्ही सोबत राहू.”,असं देखील बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले आहेत.

News Title :  Bachchu Kadu Hints Leaving Mahayuti

महत्त्वाच्या बातम्या-

“पत्नीचा गळा आवळून खून केला, नंतर इलेक्ट्रिक शॉकने..”; धक्कादायक प्रकारामुळे पुणे हादरलं

एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा! केंद्राने केली मोठी घोषणा

भाजपला आणखी एक मोठा झटका; माजी आमदार तुतारी हाती घेणार?

विश्वचषक जिंकणारा रोहित शर्मा ट्रोल; प्रोफाइल फोटोवरून सुरू झाला नवा वाद

“वरळी अपघातातील आरोपीचे मुख्यमंत्र्यांशी घनिष्ठ संबंध, आरोपी सुरतला पळाला की गुवाहाटी?”