Bachchu Kadu | प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ऑनलाईन रमीच्या व्यसनातून तेंडुलकरांच्या अंगरक्षकानं आत्महत्या केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सचिन तेंडुलकरचा सुरक्षारक्षक प्रकाश कापडे याने काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मूळ गावी आत्महत्या केली होती. या आत्महत्येचं कारण तेव्हा समोर आलं नव्हतं. मात्र आता बच्चू कडू यांनी केलेल्या आरोपांमुळे अधिक माहिती समोर आली. ऑनलाईन रमीमुळे आलेल्या कर्जबाजारीपणामुळे कापडे यांनी आत्महत्या केल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
“सचिन तेंडुलकरच्या अॅडमुळेच बॉडीगार्डचा मृत्यू”
या प्रकरणी बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी थेट इशारा दिलाय. सचिन तेंडुलकराचा अंगरक्षक त्याचं संरक्षण करत होता. मात्र जर सचिनच्याच जाहिरातीमुळे अंगरक्षकाला आत्महत्या करावी लागत असेल तर ही जबाबदारी सचिन तेंडुलकरने स्विकारली पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
“तेंडुलकर यांचा भारतरत्न म्हणून गौरव करण्यात आला आहे. मात्र,त्यांच्याच जाहिरातीमुळे अंगरक्षक आत्महत्या करत असेल तर याचा निषेध आम्ही करणार आहोत. सचिन तेंडुलकरने गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे किंवा भारतरत्न पुरस्कार तो सोडावा”, अशी मागणी बच्चू कडू (Bachchu Kadu ) यांनी केली आहे.
“सचिनचा पुतळा जाळून आंदोलन करणार”
तसंच तेंडुलकर यांनी जर जाहिरात नाही सोडली तर शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पुतळा जाळणार आहोत आणि पुन्हा आंदोलन करणार आहोत, असा इशाराच यावेळी बच्चू कडू (Bachchu Kadu ) यांनी दिला आहे.
ऑनलाईन रमीच्या व्यसनातून तेंडुलकरांच्या अंगरक्षकानं आत्महत्या केल्याच्या आरोपांमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. बच्चू कडू या प्रकरणी आक्रमक झाले आहेत. सचिन तेंडुलकर या प्रकरणी अडचणीत सापडू शकतात. आता यावर पुढे काय होतं, ते पाहावं लागेल.
News Title – Bachchu Kadu makes serious allegations against Sachin Tendulkar
महत्त्वाच्या बातम्या-
“गुन्हा दडवायला सिस्टीम एकत्र येते पण..”; पोर्शे अपघातावर ‘या’ कलाकाराची संतप्त पोस्ट
“…तर मी BJP सोडेल”, अभिनेता शेखर सुमनचं मोठं वक्तव्य
पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुलाच्या कबुलीने खळबळ!
कुख्यात गुंड गजानन मारणेनं आयुक्तांच्या आदेशाला फाट्यावर मारलं!
बारावीचा निकाल जाहीर! विद्यार्थ्यांनो पुढच्या प्रवेशासाठी काढून ठेवा ‘ही’ कागदपत्रे