“शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर, मग अजित पवार कोण?”

Bachchu Kadu | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात काल भव्य सभा पार पडली. या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.त्यांनी शरद पवार हेच भ्रष्टाचाराचे सूत्रधार असल्याचं म्हटलं होतं. सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम हे शरद पवारांचं आहे. देशात भ्रष्टाचार करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते फक्त शरद पवारांनी केलं असल्याची टीका अमित शाह यांनी केली होती.

अमित शाह यांच्या या टिकेनंतर विरोधी गटाकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी देखील अमित शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शाह यांना खोचक सवाल केला आहे.

बच्चू कडू यांचा तिखट सवाल

“शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील, तर अजितदादा कोण आहे?”, असा खोचक सवाल बच्चू कडू यांनी केलाय. यातून त्यांनी अजित पवार यांना देखील टोला लगावला आहे. तसेच अमित शाह बऱ्याचदा चुकीचे बोलतात व विसरून जातात आणि मग अंगलट येते, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं. अंगणवाडी सेविकांचे दहा वीस हजार वाढवले पाहिजे, आम्ही आलो तर नक्की वाढवू, असं बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवारांवर देखील निशाणा साधला.

संजय राऊत यांचंही अमित शाह यांना प्रत्युत्तर

दरम्यान, बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यासह अमित शाह यांच्या वक्तव्याला ठाकरे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्या सभेत अशोक चव्हाण हे शाहांच्या बाजूला बसलेले होते. त्याच अशोक चव्हाण यांच्यावर अमित शाह यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ही गोष्ट शाह यांना लक्षात नाही का?”, असा सवाल करत राऊत यांनी टीका केली.

“यांच्याच सरकारने शरद पवार यांना सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. मी शरद पवार यांचे बोट धरुन राजकारणात आलो, असेही मोदींनी म्हटले होते. मात्र, आता अमित शाह हे शरद पवार यांच्यावर आरोप करत आहेत. म्हणजेच, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात भांडण झालेले दिसत आहे, त्यांच्यात मतभेद झाल्याचं दिसत आहे.”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

News Title –  Bachchu Kadu question to Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या-

गर्भवती महिलेसोबत घडलं असं काही..; व्हिडीओ बघून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल!

मुंबईकरांनो समुद्र किनारी जाऊ नका! मुंबई पोलिसांकडून मोठं आवाहन

इंडियन रेल्वेकडून बंपर भरती, दहावी पास तरुणही करू शकतात अर्ज!

पतीसोबत कट रचून महिलेने बॉयफ्रेंडची केली हत्या, नंतर मृतदेह..; धक्कादायक प्रकाराने पोलिसही हैराण

“घटस्फोटानंतर मी खूप आनंदी आहे, मला…”; आमिर खानच्या एक्स पत्नीने अखेर मौन सोडलं