Bachchu Kadu | प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला होता. त्यामुळे नवनीत राणा यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला. बच्चू कडू महायुतीचे घटक असूनही त्यांनी आघाडी विरोधात उमेदवार दिला होता. यामुळे महायुतीला निवडणुकीत फटका बसला.
आता बच्चू कडू यांनी पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभेनंतर काही महिन्यांनंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं आहे.
महायुतीविरोधात बच्चू कडू यांची मोठी खेळी
“येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 20 ते 25 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. अमरावती जिल्ह्यात उमेदवार देणारच आहोत. पण राज्यात इतर ठिकाणीही उमेदवार देणार आहोत.सोबतच बडनेरा विधानसभा मतदारसंघातही उमेदवार देणार आहोत.”, अशी घोषणाच बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केली आहे.
रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतल्याने रवी राणा आणि महायुतीचं टेन्शन वाढणार आहे. त्यामुळे महायुतीचे नेते बच्चू कडू यांचं मन वळवण्यात यशस्वी होतात का, ते पाहावं लागणार आहे.
रवी राणा यांना बच्चू कडू यांचा धक्का
पुढे त्यांनी नवनीत राणा यांच्यावर देखील निशाणा साधला. “नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र बाबत न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला. ही निवडणूक धर्मावर झाली. आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्दावर निवडणूक लढलो. त्यामुळे आमच्या उमेदवारीमुळे नवनीत राणा पराभूत झाल्या यात फार तथ्यही नाही.”, असं बच्चू कडू (Bachchu Kadu)म्हणाले.
तसंच बच्चू कडू यांनी पराभव केला आहे असं वाटत असेल तर आपण कसे वागलो याचा विचार करावा, असा सल्लाही यावेळी बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना दिला आहे. बच्चू कडू यांच्या निर्णयामुळे आता महायुतीमध्ये चिंता वाढल्याचं म्हटलं जातंय.
News Title : Bachchu Kadu To Contest 25 Seats In Assembly Election
महत्त्वाच्या बातम्या-
‘अॅनिमल’ फेम तृप्ती डीमरीने मुंबईत घेतलं आलिशान घर; किंमत कोटींच्या घरात
“वसंत दादांचा नातू निवडून आलाय, त्यामुळे ठाकरेंची..”; विशाल पाटलांचं वक्तव्य चर्चेत
सरकार स्थापनेपूर्वीच सराफा बाजारात तेजी; सोनं महागलं, आता किंमती काय?
“सुजल्यावरच कळतंय..”; शरद पवार गटाने बॅनरद्वारे अजित पवारांना डिवचलं
सरकारी बँकेने ग्राहकांना दिला झटका! व्याज दरात केली ‘तब्ब्ल’ एवढ्या टक्क्यांची वाढ