बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते’; बच्चू कडू पंतप्रधान मोदींवर कडाडले

मुंबई | कोरोनाने मागील 16 महिन्यात देशभर धुमाकूळ घातला आहे. देशभरात काटेकोर नियोजन नसल्यानं ऑक्सिजन, लस आणि इतर आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत होती. आता कोरोना रूग्णसंख्या देशभरात वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या भूमिका बजावायला पाहिजे होत्या, त्यांनी त्या बजावल्या नाहीत. त्यामुळे आज जी आपत्ती आली आहे ती देशासोबत राज्यावर येऊन पडली आहे. देशात जर योग्य नियोजन झाले असते तर, आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते, असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रमुख आहेत, ते मोदींकडे गेले का? आम्हाला लसीकरण जास्त द्या किंवा इतर साहित्य द्या, असे एक तरी निवेदन त्यांनी पंतप्रधानांना दिले का?  महाराष्ट्रात राहून सरकारवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ते केंद्रातून काय आणू शकले, याचे उदाहरण देवेंद्रजींनी द्यावे, मग त्यांना बोलायचा अधिकार आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबईचं तर जागतिक पातळीवर कौतुक होतं आहे. जरी केंद्र सरकार दुजाभाव करत असेल तरी राज्य मात्र खंबीर आहे. सध्या इतर राज्यापेक्षा आपली स्थिती बरी आहे, असं देखिल बच्चू कडू म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

चिंता वाढली! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात म्युकरमायकोसिसचे तब्बल 111 रुग्ण

मंत्रीमंडळाच्या भर बैठकीत जयंत पाटील संतापले, म्हणाले…

अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलगा सिद्धार्थ आणि पीएसह 10 जणांवर गुन्हा दाखल

मुंबईतील सक्रिय रूग्णसंख्या घटली; बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं, वाचा आकडेवारी

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाकडून डाॅक्टरला मारहाण ; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More