बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जुन्या विनोदाने शिक्षणाची घाण केली; बच्चू कडूंचा तावडेंवर हल्लाबोल

मुंबई |  अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जुन्या विनोदाने शिक्षणाची घाण केली आहे, अशा शब्दात त्यांनी तावडेंना लक्ष्य केलं आहे.

नवीन शिक्षणमंत्री तरी ही घाण साफ करेल का? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. गेल्या साडेचार वर्षातल्या तावडेंच्या कामगिरीवर त्यांनी जोरदार टीका केली.

गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. गोरगरिब मजुरांच्या पोरांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, बालभारती, गणित, माय इंग्लिश या पाठ्यपुस्तकात शासनाने प्रामुख्याने बदल केले आहेत. या बदलावर बच्चू कडू यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-जे शिक्षण आमदाराचा मुलगा घेतो तेच शिक्षण गरिबाच्या मुलाला मिळालं पाहिजे- बच्चू कडू

-राष्ट्रवादीचे ‘राजे’ शिवबंधनात अडकणार? चर्चांना उधाण

-एकवीस, बावीस नव्हे, वीस एक, वीस दोन म्हणा; उजळणीत बालभारतीकडून धक्कादायक बदल

-मुख्यमंत्र्यांना सत्तेची गुर्मी; विजय वडेट्टीवारांचा घणाघात

-ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More