“मुख्यमंत्री आणि विखेंचं प्रेम म्हणजे राधाकृष्णाचं प्रेम”

जामखेड | मुख्यमंत्री आणि विखेंचं प्रेम म्हणजे राधाकृष्णाचं प्रेम आहे, अशी टीका प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. ते जामखेडमध्ये बोलत होते.

विरोधी पक्ष नेतेच जर भाजपसारख्या पक्षाला साथ देत असतील तर सरकारकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल करत बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

पालकमंंत्री राम शिंदेकडे जलसंधारणपद असतानाही तालुक्यात एकही पाण्याचा झरा वाहिला नाही, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवडणुकांमध्ये नावं घ्यायची आणि लोकांची दिशाभूल करायची, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-सुनील राऊत यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव करु; किरीट सोमय्यांचे कार्यकर्ते आक्रमक

-मला ‘या’ नेत्याचं काम आवडतं- अण्णा हजारे

-उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं वागणंं मूर्खपणाचं- राहुल गांधी

-सदाभाऊ खोत यांच्यासारखं मलाही मंत्रिपद मिळेल पण…- बच्चू कडू

-गुन्हा दाखल करण्याच्या आदेशावर धनंजय मुंडे म्हणतात…