“नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता”
बुलडाणा | मंत्री बच्चू कडू यांनी नितीन गडकरींचं तोंडभरुन कौतुक केलं. नितीन गडकरी पंतप्रधान असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता असं बच्चू कडू म्हणाले आहेत. ते संग्रामपूरला रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मोदी पंतप्रधान झाल्याने मंदिर, मस्जिदचा प्रश्न मिटला. पण गडकरी चांगले व्यक्ती असून ते पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता, असं बच्चू कडू म्हणाले.
ज्यावेळी मोदींनी 100 रुपयांत गॅस वाटला त्यावेळी 400 रुपयांत सिलेंडर मिळत होते. आज त्याची किंमत एक हजारच्या वर गेली आहे, असं सांगत बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
दरम्यान, याआधाही इतर पक्षाच्या नेत्यांनी गडकरींचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालंय. अनेकदा गडकरी पंतप्रधान व्हावेत असं मतही सर्वसामान्यांसह अनेक राजकीय पक्षाचे नेते मांडत असतात. त्यातच आता बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा रंगली आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! अखेर सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचं कारण आलं समोर
महाविकास आघाडी सरकार अडचणीत?; काँग्रेसमुळे टेंशन वाढलं
“केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती भाजपवाल्यांना कशी मिळते?”, सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल
मोठी बातमी! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर
आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये दाखल; राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
Comments are closed.