देश

7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्वाचा आहे- बच्चू कडू

भोपाळ | सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या भारत बंदला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यशस्वी करण्याचं आवाहन केलं आहे.

7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे. तसेच जात-पात, धर्म, प्रांत हे न पाहता सर्वांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन भारत बंदला यशस्वी करण्याचं आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय.

बच्चू कडू यांनी मागील तीन दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या दिशेने कूच केली असून त्यांचा मोटारसायकल मोर्चा आज मध्यप्रदेशच्या भोपाळ वरून वरून रवाना होणार आहेत.

बच्चू कडू हे शुक्रवारपासून दिल्ली आंदोलनासाठी हजारो शेतकऱ्यांना घेऊन निघाले आहेत. चार दिवसांआधी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे पहिला मुक्काम झाल्यानंतर परवा हजारो शेतकऱ्यांनी मध्यप्रदेश मध्ये प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बच्चू कडूंनी केलेली मदत ‘तो’ विसरला नाही; न सांगताच केलं कौतुकास्पद काम

अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका!

राज ठाकरेंची मराठी माणसाबद्दलची भूमिका मान्य, पण…- देवेंद्र फडणवीस

‘भारत बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागं करा- अशोक चव्हाण

‘परिस्थिती सुधारली नाही तर…’; छगन भुजबळांचा नाशिककरांना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या