अमरावती महाराष्ट्र

राज ठाकरे, पवारांची चौकशी लागली, मग दानवे शुद्ध घीवाले आहेत काय?- बच्चू कडू

अमरावती | राज ठाकरेंवर याआधी चौकशी लावली. आता प्रताप सरनाईकांवर चौकशी लावली. शरद पवारांचीही चौकशी लावली, मग दानवे काय शुद्ध घीवाले आहेत काय?, असा सवाल शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

ईडीची चौकशी लावून केंद्र सरकार लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करत आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

भाजपच्या काही लोकांनी कित्येक मोठी संपत्ती जमा केली आहे, एकाही भाजपच्या नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही?, असं बच्चू कडू म्हणाले.

केंद्राकडून याचं राजकारण होत आहे. जो बोलण्याचा प्रयत्न करतोय, त्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करण्याचा प्रकार निश्चितच होत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो, असं ही बच्चू कडू म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

आता विनामास्क आढळण्यास थेट अटक होणार; ‘या’ राज्य सरकारचा निर्णय

फेरीवाले आणि दुकानदारांची होणार कोरोना चाचणी; मुंबई महापालिकेचा निर्णय

राज्यात दिशा कायदा केव्हा लागू होणार?; मनसेचा गृहमंत्र्यांना सवाल

संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा; नितेश राणेंचा दावा

“विरोधकांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या