नागपूर | मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यातील पहिला टप्पा दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता. वीस ते पंचवीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असं मंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
तीन योजनांचे एकत्रीकरण करून कर्जमाफी देण्यात आली होती. त्यामुळे बर्याच अडचणी आल्या होत्या. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड ग्रामपंचायतच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यासंदर्भात आपण अकोला जिल्ह्यात सूचना दिल्या असल्याचंही कडू यांनी म्हटलं आहे.
दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा दुसरा टप्पा राहणार आहे. कर्जमाफी देताना गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असंही कडूंनी आपल्या कडू यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
दरम्यान, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थ्यांची नावं आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
इंदोरीकर महाराज नगर जिल्ह्याचं भूषण आहेत- सुजय विखे
DJ च्या तालावर बापानं काढली 22 वर्षीय मुलाची अंतयात्रा!
महत्वाच्या बातम्या-
एक चहावाला देशाचा पंतप्रधान होणं हे कौतुकास्पद- डोनाल्ड ट्रम्प
महाविकास आघाडीने अजित पवारांकडे सोपवली आणखी एक महत्वाची जबाबदारी
दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिननं घडवला होता सर्वोच्च इतिहास
Comments are closed.