अमरावती महाराष्ट्र

कंगणाला ग्रामपंचायत निवडणुकीला उभं केलं तरी…; बच्चू कडूंनी कंगणाची उडवली खिल्ली 

अमरावतीबॉलिवूड अभनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेनेमध्ये चांगलाच संघर्ष पेटला होता. मुंबई महापालिकेन तिच्या कार्यालयालर हातोडा चालवला होता. त्यानंतर कंगणाने शिवसेनेवर टीका करण्यास सुरूवात केली होती. मात्र शिवेसेनेने स्पष्ट केलं आहे की आमच्यासाठी तिचा विषय संपला आहे. अशातच मंत्री बच्चू कडू यांनी कंगणाची खिल्ली उडवली आहे.

कंगणा राणावतमुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही आणि मीडियानेदेखील तिला जास्त महत्व देण्याची गरज नाही. कंगणाला जर ग्रामपंचायत निवडणुकीला उभं केलं तरी ती निवडून येणार नाही. एवढंच नाही तिचं डीपॉझिटही झप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत मंत्री बच्चू कडू यांनी कंगणाची खिल्ली उडवली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

एखाद्या अभिनेत्रीच्या मागून भाजप घाणेरडं राजकारण करत आहे हे चुकीचं आहे. आम्ही कंगणा राणावतला कवडीची किंमत देच नसल्याचं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवरही टीका केली आहे.

दरम्यान, राज्यातील सरकार कोसळण्याचा प्रश्नच येत नाही कारण शिवसेनेचा वाघ तिथे बसला आहे, असंही कडू यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रशासनाने मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर…- खासदार संभाजीराजे

सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 3 जणांना अटक!

राजू शेट्टी यांची कोरोनावर मात, पुण्यातील रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

पुण्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव वाणींचं निध

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी- नवनीत राणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या