मुंबई | शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू कडू यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.
माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी, असं ट्विट बच्चू कडू यांनी केलं आहे.
आमदार बच्चू कडू यांना पहिल्यांदा 19 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी उपचारानंतर ते क्वारंटाईन होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. तसेच राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे.
थोडक्यात बातम्या-
“विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं, महाराष्ट्रातही तसंच होईल”
शिवजयंतीवर बंधनं घालायला ही काय मोगलाई आहे काय?- देवेंद्र फडणवीस
सनरुफ उघडून नाचत होती नवरी, तेवढ्यात घडला काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, पाहा व्हिडीओ
पूजा राठोडचा गर्भपात झाला तेथील विभाग-प्रमुख होते रजेवर, गूढ आणखी वाढलं!
“उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून मुंबईत पाठवा, आम्ही तिला उत्तम उपचार देऊ”