Top News विधानसभा निवडणूक 2019

अरे बाबांनो शेतकरी रडतोय… त्याच्याकडे बघा; बच्चू कडूंची सर्वपक्षीयांवर जोरदार टीका

मुंबई | राज्यात सत्तास्थापनेचा पेच काही सुटत नाहीये. काल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालीये. पण या सगळ्यांमध्ये सरकार अस्तिवात नसताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काय? त्यांच्या प्रश्नांचं काय होणार? असं असताना सरकार बनवायला होत असलेल्या विलंबावरून अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सर्वपक्षीयांचा जोरदार समाचार घेतला आहे.

सियोसतोंका चलने दो, एक खेल अपरंपार किसान भाई तुफामे हें भटकी हैं मजधार, अशा शब्दात त्यांनी एकीकडे सरकार बनवायला होत असलेल्या विलंबावर बोट ठेवलं आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधलं आहे.

रो रहा हैं किसान करदो उसकी नैया पार फिर जब चाहे तुम बना लो अपनी ऐ सरकार, असा सल्ला त्यांनी सर्वपक्षीयांना दिला आहे.

सियोसतोंका चलने दो, एक खेल अपरंपार किसान भाई तुफामे हें भटकी हैं मजधार… रो रहा हैं किसान करदो उसकी नैया पार फिर जब चाहे तुम बना लो अपनी ऐ सरकार, असं ट्वीट करत त्यांनी शेतकऱ्यांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या