बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एका दुचाकीवर डझनपेक्षा जास्त मुलांचा गोंधळ, पाहा व्हिडीओ

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका गाण्याने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. ‘बसपन का प्यार मेरा भूल नही जाना’, असे त्या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावर इन्स्टाग्रामवर अनेक रिल्स बनवण्यात आले आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये देखील बचपन का प्यार गाणं टाकण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये एका दुचाकीवर अनेक लहान मुलं सवार झालेली पाहायला मिळतात. ही गाडी पळत असताना गाडीवरची मुलं बचपन का प्यार हे गाण गात आहेत. या प्रकाराचा हा व्हिडीओ बाजूने कोणीतरी शूट केला आहे.

व्हिडीओमध्ये दुचाकीवर सवार असलेल्या मुलांची संख्या एक डझनपेक्षा देखील जास्त आहे. एका दुचाकीवर जागा नसताना देखील ही मुलं समायोजित करुन बसले आहेत. तर काही मुलं उभी असून एक जण चालकाच्या खांद्यावर बसलेला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील ‘गिड्डी’ अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हास्यास्पद कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी सुरक्षतेची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

पाहा व्हिडीओः

 

View this post on Instagram

 

A post shared by GiDDa CoMpAnY -mEmE pAgE- (@giedde)

थोडक्यात बातम्या-

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

सिद्धार्थच्या आत्म्याशी संवाद साधल्याचा ‘या’ व्यक्तीनं केला दावा, संवादात सिद्धार्थ म्हणतो…

माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा लोक मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात- अमृता फडणवीस

‘आज मला भारताची लेक असल्याची लाज वाटतेय’; मुनमुन संतापली

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ED चं मोठं पाऊल!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More