मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्यात सत्तांतर होऊन आता नऊ महिने झाले. पण तरीही राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पार पडलेला नाही. यावर आता आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आमचे 20 मंत्री सक्षम आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गरज नाही. लोकांची तक्रार नाही. 20 मंत्र्यांमध्ये सुद्धा मंत्रिमंडळ चालू शकतं. हे या सरकारने (Goverment) दाखवून दिलं, असं बच्चू कडू म्हणालेत.

सभेने मत जिंकली जातात, असं नाही. सभा ही फक्त शक्ती प्रदर्शनासाठी असते. शक्ती प्रदर्शनासोबत कर्तव्याची जोड पाहिजे. तुमचं कर्तव्य जर नसेल तर सभेला काहीच किंमत नाही. काम बघून लोकं मत देतात सभा पाहून नाही. महविकास आघाडीचं कर्तृत्व शून्य आहे, अशी टीका बच्चू कडूंनी केलीये.

दरम्यान, शिंदे सरकार आल्यानंतर बच्चू कडू पुन्हा मंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार पार पडला नाही. यावरून बच्चू कडूंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-