अमरावती | शिंदे सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी रखडलेला दुसरा मंत्रीमंडळ विस्तार अजून पार पडला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी नाराजी व्यक्त केलीये.
मंत्रिमंडळ विस्तार होणार नसेल तर स्पष्ट सांगा, असं आवाहन बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय.
ते काय म्हणतात? फुल काढायचं, पुन्हा खिशात ठेवायचं, काय टेक्निकल बाबी असतील ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगाव्यात. या अडचणी आहेत, यामुळे विस्तार होऊ शकत नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
असं वाटतंय की, एकतर विस्तार करु नका. डायरेक्ट सांगून द्या की, विस्तार होत नाही. सगळे शांततेने सरकारसोबत राहतील, असं बच्चू कडू म्हणाले.
भाजपसोबत (Bjp) सरकार स्थापन करुन सहा महिने उलटत नाही तोच शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिंदे गटातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. या नाराज नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे बच्चू कडू यांचं.
जेव्हा शिंदे सरकार स्थापन झालं त्यावेळीही मंत्री पद मिळालं नाही म्हणून बच्चू कडूंनी जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. मात्र अजून ही त्यांना सरकारमध्ये मंत्री पदाची संधी दिली नाही. यामुळे बच्चू कडूंची नाराजी शिंदेंची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
- “शिंदे-फडणवीस सरकार व्हेंटिलेटरवर, सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही”
- नारायण राणेंना मोठा धक्का?; केंद्रीय मंत्रिपद जाणार?
- राजकारणात खळबळ; झेडपी अध्यक्षाच्या मुलाचा नको तसला व्हिडीओ व्हायरल
- “अरे झाकणझुल्या आता दिवसाही गांजा ओढायला सुरुवात केलीस का?”
- अखेर उर्फीनं केला पूर्ण कपडे न घालण्यामागचा मोठा खुलासा