बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा, पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल”

मुंबई | मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केल्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात आंदोलनासाठी एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात आंदोलन देखील होणार आहेत. मराठा क्रांती आंदोलनाची सुरुवात काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरातून झाली होती.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा यासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने अॅड. संदीप देशमुख यांनी फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात रविवारी दाखल केली आहे. राज्य सरकारआधीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करून या याचिकेत आरक्षणाच्या 50 टक्क्यांची मर्यादा ठरवणाऱ्या निकालाला आव्हान देण्यात आलं आहे.

राज्य सरकारनेदेखील तत्काळ फेरविचार याचिका दाखल केली पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे, हे केले तर पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल. मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा आहे, त्यामुळे मराठा आरक्षण टिकविण्यासाठी अतिशय ताकदीने राज्य सरकार व केंद्र सरकारने दोघांनी प्रयत्न करावा. समाज म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, वेगवेगळ्या 54 मुद्द्यांना अनुसरून आम्ही फेरविचार याचिका दाखल केल्याचं विनोद पाटील यांनी सांगतलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनेही तत्काळ याचिका दाखल करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

जेमिनसनचा पंजा! भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात

पुण्यातील गर्दीला अजित पवार जबाबदार, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा- प्रविण दरेकर

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल”

दिलासादायक बातमी! एकदा कोरोना होऊन गेल्यावर दुसऱ्यांदा संक्रमणाचा धोका कमी

कोरोना काळात शेतकरी बांधव राबला म्हणून इतर जगू शकले- विजय वडेट्टीवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More