बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे कलाकारांवरही वाईट वेळ, तारक मेहता फेम नट्टू काकांची परिस्थिती गंभीर

मुंबई | गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असलेल्या सब टीव्ही वरच्या तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार नटुकाका यांच्यावर उतारवयात कोरोनामुळे वाईट परिस्थिती ओढवल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे काम नसल्याने अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. मात्र आता कोरोनातून जग सावरत असतानाच दुसऱ्या लाटेने पुन्हा धडक मारली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असताना मुंबईतील सर्व शूटिंग बंद करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत नटुकाकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांना देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

गेल्या महिनाभरापासून नटुकाका शूटिंग बंद असल्याने शूटिंगवर परतू शकलेले नाहीत. त्यामुळे, त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्याबरोबरच, एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं कि, माझं वय जास्त असल्याने माझ्या घरचे नेहमीच काळजीत असतात. तसेच मार्च महिन्यामध्ये शेवटचं शूटिंग संपवलं त्यानंतर आता पुन्हा शो मधील माझ्या पात्राचं शूट कधी असेल ते माहिती नाही. तो पर्यंत मला घरीच थांबावं लागेल, असंही त्यांनी बोलून दाखवलं.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी यांच्यासह काही कलाकारांना ही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शूटिंगवर निर्बंध लावण्यात आले. पण आता शूटिंग नेमकं कधी सुरू होणार आणि कलाकारांची आर्थिक गाडी रुळावर कधी येणार याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

“नवाब मलिक यांना हटवून, परभणीला पूर्णवेळ देणारा, कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या”

‘या’ ठिकाणावरून 318 ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर घेऊन निघालं विमान; अवघ्या काही तासांत भारतात येणार 

नोकरीला नसून देखील 15 वर्षांपासून बँकेत जमा व्हायचा पगार, मोठं रहस्य आलं समोर

“भारतात कोरोना मृतांची संख्या लपवली जात आहे, खरा आकडा 4 ते 5 पट अधिक”

यांच्यापेक्षा गिधाड बरी! वॉर्डबॉयनं मृताच्या बोटाचे ठसे वापरून केलं हे धक्कादायक कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More