Badlapur Crime | बदलापूर येथे घडलेल्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटलेले दिसत आहेत. 4 वर्षीय आणि 6 वर्षीय मुलींवर त्यांच्याच शाळेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलीये. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं.
अक्षय शिंदेबद्दल धक्कादायक माहिती समोर
अक्षयच्या घराची संतप्त ग्रामस्थांनी तोडफोड केली असून त्याच्या कुटुंबियांनी गाव सोडलं आहे. अक्षय शिंदे याच्याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे फक्त दहावी पर्यंत शिकला आहे. 24 वर्षांच्या अक्षयची तीन लग्नं झाली होती. पण त्याच्या तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत.
बदलापूरच्या एका शाळेत तो सफाई कामगार म्हणून काम करत होता. त्याआधी तो सुरक्षारक्षक म्हणूनही काम करायचा. एका कंत्राटाद्वारे खासगी शाळेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली.
आरोपी अक्षय शिंदेने पोलीस तपासात गुन्हा कबूल केला आहे. आरोपी अक्षय शिंदेचा जबाब व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा जबाब मोठा पुरावा म्हणून पोलीस कोर्टात सादर करणार आहेत.
बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी असल्याचं समजताच त्याच्या कुटुंबियांना खरवईतल्या ग्रामस्थांनी घराबाहेर काढलं. त्यानंतर घराची तोडफोड करण्यात आली. या प्रकारानंतर अक्षयचे आई-वडील आणि भाऊ गाव सोडून गेले.
दरम्यान, बदलापूर येथे या घटनेविरोधात मोठं जन आंदोलन झालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे आंदोलन सुरु होतं. त्या शाळेच्या परिसरात मोठा जमाव जमला होता. रेल्वे स्टेशनवर लोक आंदोलनाला बसले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
55 कोटी लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार मोठी आर्थिक मदत
Post Office ची जबरदस्त स्कीम; महिन्याला कमवा 20 हजारांपेक्षाही अधिक रुपये
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार, IMD कडून हायअलर्ट
ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांच्या पुढे, जाणून घ्या लेटेस्ट दर
“..तर मी स्वतः आंदोलनात उतरेल”; MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात