बदलापूर स्टेशनवर आंदोलक आक्रमक; पोलिसांवर दगडफेक

Badlapur School Crime | गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत, अशातच बदलापूरमध्ये (Badlapur School Crime) अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात असतानाच आता शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. मात्र हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून नागरिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिक रेल्वे रुळावर उतरले आहेत. यामुळे गेल्या दोन तासांपासून कल्याण कर्जत मार्गावर लोकलसेवा ठप्प झालीये.

बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिकांनी रेलरोको आंदोलन केलंय. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रुळावरून बाजूला होण्यास नकार दिला आहे.

Badlapur School Crime | काय आहे प्रकरण?

बदलापूर पूर्वेला असणालेल्या एका नामांकित शाळेतील एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या अशा दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जेव्हा पीडित मुलींचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तेथील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यांची तक्रार नोंद करून घेण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचीही माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“तुमच्या दीड हजारांनी काही होणार नाही, आम्हाला न्याय द्या”; बदलापूर अत्याचार प्रकरणी महिलेचा संताप

“बॉयफ्रेंडसोबत फिरायला..”; कोलकाता प्रकरणावर ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

…त्या दोन चिमुकल्यांची काय चुक? नराधमाने चिमुकल्यांवर शाळेत केला बलात्कार

जयंत पाटील अजितदादांना लवकरच धक्का देणार? नेमकं काय होणार

‘या’ कारणामुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार!