“तुमच्या दीड हजारांनी काही होणार नाही, आम्हाला न्याय द्या”; बदलापूर अत्याचार प्रकरणी महिलेचा संताप

Badlapur School rape case | कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्काराची घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्रात एक संतापजनक प्रकार घडला आहे. बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार करण्यात आला आहे. शाळेतील सफाई कामगाराने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी बदलापूर येथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला आदोलकांनी घेराव घातला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावरही आंदोलक जमा झाले आहेत. या आंदोलनातीलच एका महिलेने संतप्त सवाल उपस्थित केला आहे.(Badlapur School rape case )

बदलापूर अत्याचार प्रकरणी महिलांचा संताप

“आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे. तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको आहेत. आमच्या मुलीच सुरक्षित नसतील तर आम्ही काय करावं?”, असा सवाल या आंदोलक महिलेने केला आहे. तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणता मग लाडक्या बहि‍णींच्या मुलीला न्याय द्यायला तुम्ही कुठे आहात? असा सवाल या महिलेने केला आहे. (Badlapur School rape case )

“अशाच घटना घडत राहिल्या तर आमच्या मुलींना आम्हाला घराच्या बाहेर काढताना विचार करावा लागेल. माझी मुलगी सुरक्षित आहे का?, आम्ही आमच्या मुलींना रोज गुड टच, बॅड टच शिकवतो. मात्र, समोरच्या नराधमाला गुड टच, बॅड टच काय असतो हे समजत नसेल तर काय फायदा?”, असे संतप्त सवाल महिलांकडून उपस्थित केले जात आहेत.

एकनाथ शिंदे यांचे निर्देश-

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नराधमावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. “बदलापूरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या नराधमाने हे दुर्दैवी कृत्य केलं आहे, त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन यावर तात्काळ दोषींवर कारवाई करावी”, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.  (Badlapur School rape case )

तसेच, “याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच अशाप्रकारच्या घटना यापुढे होऊ नये, म्हणून संस्था चालक, शाळा या सर्व लोकांवर एक नियमावली तयार केली जाईल.”, असंही शिंदे म्हणाले आहेत.

News Title :  Badlapur School rape case 

महत्वाच्या बातम्या-

“बॉयफ्रेंडसोबत फिरायला..”; कोलकाता प्रकरणावर ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

…त्या दोन चिमुकल्यांची काय चुक? नराधमाने चिमुकल्यांवर शाळेत केला बलात्कार

जयंत पाटील अजितदादांना लवकरच धक्का देणार? नेमकं काय होणार

‘या’ कारणामुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार!

मृत्यूच्या खोट्या अफवांवर भडकला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी जीवंत आहे”