…त्या दोन चिमुकल्यांची काय चुक? नराधमाने चिमुकल्यांवर शाळेत केला बलात्कार

Badlapur School l देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्काराची घटना ताजी असतानाच बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात बलात्कार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बदलापूर शहरात झालेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे.

बदलापुरात घडली अत्यंत हृदयद्रावक घटना :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक संतप्त झाले आहेत. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय हे आहे. अत्याचाराची ही धक्कादायक घटना घडल्यानंतर सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित मुलींचे पालक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता महिला पोलीस अधिकाऱ्याने त्यांना तब्बल 12 तास तिथे डांबून ठेवले आणि तेथे गदारोळ झाला.

गदारोळानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. या घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक, संबंधित वर्ग शिक्षक आणि दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. मात्र, याबाबत शाळा प्रशासनाने अद्याप पालकांशी समोरासमोर चर्चा केलेली नाही. शाळा प्रशासन बोलायला तयार नसल्याने पालक सध्या प्रचंड संतापले आहेत.

https://x.com/jayeshwani/status/1825452530098163862?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1825452530098163862%7Ctwgr%5E234a7a798665eb3993dc8f687600712b0188ed79%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fcrime%2Fbadlapur-school-4-year-old-girl-abuse-by-male-cleaner-in-school-toilet-how-girl-told-her-mother-about-abuse-1306977

Badlapur School l शहरवासीयांनी शाळेबाहेर केली घोषणाबाजी :

आज सकाळी बदलापूरच्या संतप्त नागरिकांची मिरवणूक शाळेच्या गेटमध्ये घुसली. येथे नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, शाळा चालवणाऱ्या प्रशासनातील कोणीही पालकांना सामोरे जाण्याचे धाडस दाखवले नाही. शाळेच्या गेटजवळ लोकांचा जमाव जमला मात्र तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाशी याबाबत कोणीही बोलायला पुढे आले नाही.

मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या सफाई कामगाराच्या कंत्राटदाराचा करार रद्द करण्यात आला आहे. शाळेने पालकांना माफीनामा पत्र जारी केले आहे. जे घडले ते दुर्दैवी, घृणास्पद आणि निषेधार्ह असल्याचे त्यात म्हटले आहे. आरोपींविरुद्ध आम्ही आमच्या क्षमतेनुसार पोलिसांना सहकार्य केल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले आहे. तसेच या घटनेनंतरआरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र या धक्कादायक प्रकारानंतर शाळेतील पालकांच्या मनात भितीचे वातावरण आहे.

News Title : Badlapur School Rape News

महत्वाच्या बातम्या-

जयंत पाटील अजितदादांना लवकरच धक्का देणार? नेमकं काय होणार

‘या’ कारणामुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार!

मृत्यूच्या खोट्या अफवांवर भडकला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी जीवंत आहे”

ग्राहक आनंदी! सोनं झालं स्वस्त, रक्षाबंधनानंतर ‘इतके’ घसरले भाव

…तर सीमकार्ड होणार ब्लॅकलिस्ट; सप्टेंबरपासून TRAI आणणार नवा नियम