देश

आधी बेदम मारहाण, नंतर मुंडण करून पाजलं मुत्र, राजस्थानातील संतापजनक घटना!

जैसलमेर | अनैतिक संबंधांच्या प्रकरणावरून एका तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच तरूणाचे मुंडण करून त्याला जबरदस्ती मुत्र प्यायला भाग पाडलं. राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यात हा किळसवाणा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अनैतिक संबंधांच्या प्रकरणावरून तरूणाला झाडाला बांधून आरोपींनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच हा प्रकार संपला नाही तर पीडित तरूणाला या आरोपींनी मुंडण करायला लावून बळजबरी मुत्र प्यायला भाग पाडलं. मात्र हा प्रकार पोलिस स्टेशनमध्ये जायला नको हे दोन्ही गटांनी परस्पर संमतीने आधीच ठरवून टाकले.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. पोलिसांना या घटनेची माहिती लागताच त्यांनी पीडित तरूणांच्या घरी धाव घेतली. मात्र दोन्ही गटांनी तक्रार करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र पोलिसांनी व्हिडीओचा आधार घेत 249, 323 आणि 343 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करावे , विधानसभा अध्यक्षांची सूचना

….नाहीतर शिक्षण मंत्रालयाचे अवजड उद्योग खाते होईल, शिवसेनेचा टोला

शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता कृषीमंत्र्यांची केंद्र सरकारकडे महाराष्ट्रासाठी विशेष मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या