बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची हॅट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

टोकियो | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा आज सातवा दिवस आहे. आज भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूनं डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. 

सिंधूनं मियाला चांगली लढत देत हा सलग तिसरा सामना जिंकला. या सामन्यात सिंधूनं डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट 21-15, 21-13 असा पराभव केला. या विजयामुळे सिंधूची मियाविरूद्धची आत्तापर्यंतच्या सामन्यांमधील कामगिरी 5-1 अशी झालीय. म्हणजेच या दोघींमध्ये झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने सिंधूनं जिंकलेत.

पीव्ही सिंधूनं अवघ्या 41 मिनिटांमध्ये हा सामना जिंकला आहे. आता क्वार्टर फायनलमध्ये सिंधूचा सामना जपानच्या यामागुची आणि दक्षिण कोरियाचा किम गा उन यांच्यात होणाऱ्या विजयी खेळाडूसोबत होणार आहे.

दरम्यान, बुधवारी मुलींनीच विजयी कामगिरी करताना भारताला एकाच दिवशी तीन विजय मिळवून दिले. बॅडमिंटनमध्ये पी.व्ही. सिंधूने बाद फेरीत प्रवेश केला. बॉक्सिंगमध्ये पूजा राणीने उपांत्यपूर्व फेरी गाठली, तर तिरंदाजीमध्येही दीपिका कुमारी उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

थोडक्यात बातम्या –

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांनी पूरग्रस्तांसोबत केलं जेवण!

मोठी बातमी! राज्यातील निर्बंधांबाबत महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर

“बरेच दिवस अच्छे दिनची वाट पाहिली, आता सच्चे दिन दाखवण्याची गरज”

…म्हणून अमेरिका भारताला करणार तब्बल ‘एवढ्या’ कोटी डाॅलरची मदत

रश्मी शुक्ला यांचा मोठा गौप्यस्फोट; ‘त्यावेळी सरकारी आदेशाने…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More