अमरावती महाराष्ट्र

संतापजनक! कोरोनाची लागण झाल्याचं सांगत 24 वर्षीय तरूणीची चक्क गुप्तांगातील चाचणी

बडनेरा |  कोरोनाच्या संपर्कात आल्यानं एका 24 वर्षीय तरूणीचा चाचणीसाठी गुप्तांगातील स्वॅब घेण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बडनेरा पोलिसांनी याप्रकरणी कोविड लॅबमधील आरोपीस अटक केली असून बलात्कारासह विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरूणी अमरावती शहरात आपल्या भावाकडे राहत असून एका माॅलमध्ये काम करत असे. माॅलमधील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानं संपर्कातील 20 जणांचे स्वॅब ट्रामा केअर सेंटरमध्ये घेण्यात आले होते. मात्र स्वॅब घेणाऱ्या आरोपी देशमुखनं पीडित तरुणीला सेंटरवर बोलावून घेत तुमची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली असल्याचं सांगितलं.

तसंच तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल असं सांगितलं. पीडित तरूणीनं आरोपी व्यक्तीस तपासणीसाठी महिला नाही का? अशी विचारणा केली. आरोपीनं तपासणीसाठी महिला कर्मचारी नसल्याचं सांगत तुमच्यासोबत एका महिलेस घेऊ शकता, असं सांगितलं आरोपीनं यानंतर पीडितेची गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली.

स्वॅब तपासणी झाल्यावर टेक्निशियननं तुमची टेस्ट निगेटिव्ह आल्याचं पीडित महिलेला सांगितलं. योनीद्वार स्वॅब घेण्याच्या प्रकारावर तरूणीस शंका आली. तीनं याची माहिती आपल्या भावास दिली. त्याने याबाबत डाॅक्टरांना माहिती विचारली असता अशी कोणतीही टेस्ट कोविड दरम्यान केली जात नसल्याचं त्यांनी सांगितलं . याप्रकरणी आरोपी अल्पेश अशोक देशमुख (वय 30) विरोधात विवीध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बाहुबलीचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या कुटुंबाला कोरोनाचा विळखा!

विद्यार्थ्यांच्या हिताचा सरकारने घेतला होता निर्णय पण केंद्रीय परिषदेचा नकार, देशमुखांची कोर्टात जाण्याची तयारी

मुख्यमंत्र्यांकडून दहावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन तसंच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

रूग्णसंख्या वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली गोड बातमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या