बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंचांशी हुज्जत भोवली, शाकीब अल हसनवर कडक कारवाई

कोलंबो | पंचाच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करणारा बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनला आयसीसीकडून त्यांच्या मानधनाच्या 25 टक्के रकमेचा दंड ठोठवण्यात आला आहेे. शेवटच्या षटकातील दुसरा बाॅऊन्सर नोबाॅल न दिल्यामुळे त्यानं पंचाशी हुज्जत घातली होती.

कोलंबोमध्ये झालेल्या श्रीलंकेविरोधातल्या अखेरच्या सामन्यात हा प्रकार घडला होता. त्यानंतर काही काळ सामना थांबला होता. सामनाधिकारी ख्रिस बाॅड यांनी हस्तक्षेप करत सामना पुन्हा सुरू केला.

त्याचबरोबर, बांगलादेशचा राखीव खेळाडू नुरूल हसनवरही दंड ठोठवण्यात आला असून, दोघांवरही मानधनाच्या 25 टक्के रकमेबरोबर एक दंड गुण अशी कारवाई करण्यात आली.

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More