मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने घेऊन गेले ‘या’ मतदारसंघात पैशांच्या बॅगा; ‘या’ बडया नेत्याचा आरोप

Eknath Shinde

Eknath Shinde l आज राज्यात 11 जागांसाठी मतदान पार पडत आहे. या सर्व जागांसाठी अनेक दिग्गजांनी जीवाचे रान केले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक येथे गेले असता त्यांनी आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा नेल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भातील व्हिडीओ देखील ट्विट केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये पैसे वाटले; संजय राऊतांना आरोप :

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची धावपळ सुरु असताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये जाताना सोबत पैशांनी भरलेल्या बॅगा नेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्याच्या अहमदनगर, पुणे अशा विविध भागांमध्ये भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, आता खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच हेलिकॉप्टरमधून मतदारांना पैसे वाटण्यासाठी नेले असल्याचा आरोप केला आहे.

Eknath Shinde l संजय राऊतांनी केला व्हिडीओ ट्विट :

यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी की, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहेत. त्यावेळी पोलिसांच्या हातात जड बॅगा दिसत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा कशाला लागत आहेत? यामधून कोणता माल नाशिकला पोहचवला जात आहे? तसेच निवडणूक आयोग हे फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप धडधडीत सुरु आहेत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मात्र आता यासर्व प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच संजय राऊतांनी केलेला आरोप कितपत योग्य आहे तसेच त्याची चौकशी होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

News Title – Bags full of money in the hands of Eknath Shinde’s bodyguards, Sanjay Raut’s allegation

महत्त्वाच्या बातम्या

मनोरंजनसृष्टीत शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू

राजकारणात तापणार! निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली अत्यंत कडू शब्दात टीका

अहमदनगरमध्ये आदल्या रात्री भाजपने पाडला पैशांचा पाऊस; व्हिडीओ समोर

या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळेल; विरोधकांना धूळ चारणार

“…म्हणून आम्ही राज ठाकरेंना सोबत घेतलं”; मोदींनी सांगितलं कारण

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .