मनोरंजन

बाहुबलीचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या कुटुंबाला कोरोनाचा विळखा!

अमरावती | बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अनेक घटना पहायला मिळाल्या. मात्र आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही कोरोनानं शिरकाव केला आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांना देखील करोनाची लागण झाली आहे. राजामौली यांनी ट्विट करत आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली.

माझ्या समवेत कुटूंबीयांना गेल्या काही दिवसांपाहून सौम्य तापाची लक्षणं आढळून आली. या दरम्यान आम्ही आमची योग्य पद्धतीनं काळजी घेत होतो. मात्र कोरोनाची टेस्ट केली असता आमचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानं आम्ही घरीच होम क्वारंटाईन राहणार आहोत, असं राजामौली यांनी ट्विट करत सांगितलं.

तसेच डाॅक्टरांनी उपचार केल्यानंतर आमचा ताप निवळला आहे. कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला असला तरी आमच्या कुटुंबीयांतील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लक्षणं आढळून आलेली नाहीत. तरिही आम्ही सरकारच्या गाईडलाईन्सप्रमाणं स्वतःला होम क्वारंटाईन करत असल्याचंही राजामौली यांनी सांगितलं आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर प्लाझ्मा दान करण्याचा निर्णयही राजामौली यांनी घेतला आहे. जेणेकरून प्लाझ्माचा एखाद्या कोरोना बाधीत रूग्णाला फायदा होईल, असं मतही राजामौली यांनी ट्विट करत व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विद्यार्थ्यांच्या हिताचा सरकारने घेतला होता निर्णय पण केंद्रीय परिषदेचा नकार, देशमुखांची कोर्टात जाण्याची तयारी

मुख्यमंत्र्यांकडून दहावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन तसंच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

रूग्णसंख्या वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली गोड बातमी

भगवान श्रीराम भारतीय संस्कृतीचे प्रतिक- राज्यपाल आरिफ मोहम्मद खान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या