शाहरुखचा विक्रम बाहुबलीने मोडला, एका दिवसात सर्वाधिक कमाई

बाहुबली सिनेमाचे एक पोस्टर

मुंबई | बाहुबली 2 ने पहिल्या 3 दिवसांमध्ये 128 कोटी रुपयांची कमाई केलीय. बाहुबलीची ही फक्त हिंदीची कमाई आहे. या कमाईसोबतच एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा अभिनेता शाहरुख खानच्या हॅप्पी न्यू ईअरचा विक्रमही बाहुबलीने आपल्या नावे केलाय.

हॅप्पी न्यू ईअरने एका दिवसात 44 कोटी 97 लाख रुपये कमावण्याचा विक्रम केला होता. मात्र रविवारी बाहुबलीने हिंदी पट्ट्यात 46 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केलीय. करण जोहरने या कमाईचे आकडे शेअर केलेत.

 

तुम्हाला बाहुबली 2 कसा वाटला? आम्हाला आमच्या http://www.facebook.com/thodkyaat या लिंकवर क्लिक करुन नक्की सांगा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या