मनोरंजन

‘बाहुबली’चा देशासाठी मदतीचा हात; 4 कोटींची केली मदत

Loading...

हैद्राबाद | कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. प्रत्येक जण या महामारीपासून वाचण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहेत. सरकारदेखील विविध योजनांची अंमलबजावणी करत असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहे. तर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

सरकारला मदत व्हावी यासाठी काही सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने आर्थिक मदत केली आहे.

Loading...

चीनपासून फैलाव झालेल्या कोरोना विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. त्यामुळे या विषाणूच्या कचाट्यामध्ये आतापर्यंत अनेक जण सापडले असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या उपचारासाठी अभिनेता प्रभासने तब्बल 4 कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याचं कळतंय.

प्रभासने 4 कोटी रुपयांपैकी 3 कोटी रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीच्या माध्यमातून दिले आहेत. तर उर्वरित 50-50 लाख रुपये अनुक्रमे आंध्र प्रदेश आणि तेलंगना राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दिल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

घरात, रुग्णालयात की फोटो फ्रेममध्ये, कुठे राहायचं हे तुमच्या हातात- अमोल कोल्हे

अन्नधान्याचा काळाबाजार होत असेल तर थेट मला फोन करा- दादा भुसे

महत्वाच्या बातम्या-

फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही तर…; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये- उद्धव ठाकरे

कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीम जयंती साजरी करू- रामदास आठवले

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या