बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात अशी यांची मानसिकता”

मुंबई | भाजप आमदार गोपीचंद पडळकर नेहमी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. त्यातच आता पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. काल राज्य सरकारने अचानक आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून आता पडळकरांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

अनेक सरकारी विभागात 11 हजार 351 पदं रिक्त आहेत. तरीही त्यांनी एमपीएससीकडे फक्त 4 हजार 264 पदाची मागणी केली. स्वत:च्या मुलांना खासदार आमदार करण्यासाठी यांच्याकडे प्रस्थापित रिक्त पदं आहेत. मग बहुजनांच्या पोरांना फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच त्यांची मानसिकता आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

पदभरती आणि नियुक्तांवरुन प्रशासन आणि सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही, असंही गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे. तसेच हे एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळतायेत का?, असा खोचक सवाल देखील पडळकरांनी उपस्थित केला आहे,

दरम्यान, कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात जवळपास 2500 पदं रिक्त होती. त्यावेळी अमित देशमुख यांनी कोणतीही पदं भरण्याची मागणी केली नाही, अशी टीका देखील पडळकरांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘लोकांना वाटलं मी लय सिरीयस आहे, आपलं शेवटचं मत टाकावं’; दानवेंनी सांगितला मजेशीर किस्सा

“लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारला”

‘…तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक?’; ठाकरे सरकारला घरचा आहेर

“मोदीजी अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी शाॅपिंग करा”

“सोनू सूद जिवंत असो वा नसो, लोकांना मोफत उपचार मिळालाच पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More