Bajaj Pulsar l जगातील पहिली CNG बाईक लाँच केल्यानंतर आता बजाज कंपनीने Pulsar N125 मॉडेल लाँच करणार आहे. कारण बजाज कामोनी आपली नवीन पल्सर आणखी वेगवान बनवण्याच्या तयारीत आहे. त्याची स्टाइलिंग मोठ्या पल्सर एन मॉडेल्सच्या अनुरूप असणार आहे. तर या बाईकचे फीचर्स काय आहे हे आपण जाणून घेऊयात…
फीचर्स काय असणार? :
या नवीन बजाज पल्सरमध्ये एलईडी डीआरएल, अलॉय व्हील आणि इंधन टाकीसह प्रोजेक्टर लेन्स हेडलॅम्प बसवले जाऊ शकतात. तसेच या बाईकला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह सुसज्ज केले जाऊ शकते. कंपनी या बाइकमध्ये स्प्लिट सीट देण्याची शक्यता आहे. याशिवाय बाईकच्या मागील बाजूस एलईडी दिवे देखील मिळणार आहेत.
नवीन बजाज पल्सर 125 CC सिंगल सिलेंडर मोटरसह येऊ शकते, जी 5-स्पीड गियर बॉक्सशी जोडली जाऊ शकते. बाइकमध्ये स्पोर्ट कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टीम बसवली जाऊ शकते. तर आता आपण या बाईकची किंमत काय आहे असणार हे जाणून घेऊयात.
Bajaj Pulsar l बाजारात कोणत्या बाइक्सशी स्पर्धा करणार? :
भारतीय बाजारात बजाज पल्सर 125 डिस्कची एक्स-शोरूम किंमत 92,883 रुपयांपासून सुरू होते. तर ही बाईक एन सीरिजमध्ये आली तर तिचे नवीन मॉडेल कोणत्या रेंजमध्ये बाजारात येईल हे पाहावे लागेल. याशिवाय Bajaj Pulsar N 125 लाँच होताच अनेक बाईकशी टक्कर देऊ शकते. ही मोटरसायकल Hero Xtreme 125R, TVS Raider 125 आणि Bajaj Freedom 125 CNG ला टक्कर देणार आहे.
News Title : Bajaj Pulsar N125 Bike Launch
महत्वाच्या बातम्या –
सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगनी दिली ‘इतक्या’ लाखांची सुपारी!
“छान साडी घालणं आणि फक्त…”; रूपाली ठोंबरेंनी रूपाली चाकणकरांना सुनावलं
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता!
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी जाहीर केलं बड्या नेत्याचं नाव