पिंपरी | महिलांना होतकरू बनविण्यासाठी बचत गट हे प्रभावी माध्यम आहे. मी बचत गटातूनच घडले आहे. महिला बचत गटांची संचालिका ते बीजमाता अशी माझी वाटचाल झाली आहे. मी महिला बचतगटांच्या चळवळीतून बीजमाता झाले. काळ्यामातीशी जोडले गेल्याने मला पद्मश्री पुरस्कार मिळाला, असं बीजमाता राहीबाई पोपरे यांनी म्हटलं आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्लू डी मैदानावर आयोजित केलेल्या पवना थडी जत्रेत त्या बोलत होत्या.
महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पवनाथडी जत्रा आहे. यंदाच्या प्लास्टिक मुक्त पवनाथडी जत्रा हा उद्देश आहे. ही जत्रा आठ मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याचं पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, व्यासपीठावर महापौर उषा ढोरे, प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळीकर, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, उपमहापौर तुषार हिंगे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती निर्मलताई कुटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून नवनीत राणांनी लोकसभेत घेतली ही काळजी
“हा केतकर दररोज कांबळे-पवार यांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो”
महत्वाच्या बातम्या-
‘विधानसभेत लोकायुक्त कायदा मंजूर करा’; अण्णा हजारेंचं उद्धव ठाकरेंना पत्र
योगींसोबतच्या त्या चर्चेत काय झालं?; संजय राऊत सांगतात…
मला परत खासदारकी द्या; रामदास आठवलेंची जे.पी. नड्डांना विनंती
Comments are closed.