नेत्याला सोडवण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यावर हल्ला

भोपाळ | अटकेत असलेल्या आपल्या नेत्याला सोडवण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शुक्रवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. 

कमलेश ठाकूर नावाच्या व्यक्तीला दारु पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलं होतं. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यावरच हल्ला चढवला. 

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर हल्लाच केला नाही तर कमलेश ठाकूर यांना खांद्यावर बसवून नेलं. याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी पोहोचल्यानंतर ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या