Vinesh Phogat | भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मोठा झटका बसला आहे. देशाची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटचे (Vinesh Phogat) वजन अधिक असल्याचे सांगत तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे आता अंतिम लढतीच्या आधी ती अपात्र ठरली. तिचे वजन 100 ग्रॅम अधिक असल्याचं आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
बजरंग पुनियाची पोस्ट चर्चेत
विनेशने सलग 3 लढतीत विजय मिळून देशाचे या ऑलिम्पिकमधील चौथे पदक निश्चित केलं होतं. विनेशचा मैदानावरील आणि मैदानाबाहेरील संघर्षामुळे सर्वजण तिचे कौतुक करत होते. पण आज सकाळी तिच्या अपात्रतेची बातमी समोर आली आणि सर्वांना एकच धक्का बसला. यानंतर भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान बजरंग पुनिया याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. बजरंगने विऩेशसाठी एक पोस्ट केली आहे.
Vinesh Phogat | “विनेश तू धैर्य आणि नैतिकतेची सुवर्णपदक विजेती आहेस”
विनेश तू धैर्य आणि नैतिकतेची सुवर्णपदक विजेती आहेस. तु भारताची मुलगी आहेस आणि हे मेडलही देशाचंच आहे. ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी काल खेळण्यापूर्वी तुमचे वजन केलं, तेव्हा ते अचूक होतं. आज सकाळी जे घडलं त्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाहीय. 100 ग्रॅम. तुमच्यासोबत असं घडले यावर विश्वास बसत नाही. संपूर्ण देशाला अश्रू आवरता येत नाहीत. सर्व देशांची ऑलिम्पिक पदके एका बाजूला आणि तुमचे पदक दुसऱ्या बाजूला, असं बजरंग पुनियाने (Bajrang Punia) म्हटलंय.
जगातील प्रत्येक माणूस तुमच्यासाठी प्रार्थना करत होता. जगातील प्रत्येक स्त्रीला हे पदक आपलं स्वत:चं पदक असल्यासारखं वाटत होतं. जगातील सर्व महिलांचा आवाज योग्य ठिकाणी पोहोचावा अशी माझी इच्छा आहे. मला आशा आहे की ऑलिम्पिक खेळणाऱ्या जगातील सर्व महिला कुस्तीपटू विनेशच्या पाठीशी एकजुटीने उभे राहतील, असा विश्वासही बजरंगने (Bajrang Punia) व्यक्त केला.
दरम्यान, आज 7 ऑगस्ट रोजी अपात्र ठरवण्याचा निर्णय झाल्यानंतर विनेशला याचा मोठा धक्का बसला. बेशुद्ध झालेल्या विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाला. अशात विनेशचे रुग्णालयातील फोटो समोर आले आहेत. ज्यात ती एका मॅटवर हताश आणि निराश होऊन बसल्याचं दिसतंय.
💔😭
विनेश तुम हिम्मत और नैतिकता की गोल्ड मेडलिस्ट होमाटी की बेटी हो इसलिए ये मेडल भी माटी का है. बहुत हौसले से लड़ी हो. कल जब खेलने से पहले ओलंपिक ऑफिशियल्स ने आपका वजन लिया तो आपका वजन एकदम परफेक्ट था.
आज सुबह जो हुआ उसपर कोई यकीन नहीं करना चाहता.
100 ग्राम. यकीन ही नहीं…
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) August 7, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! 12 वी पास तरुणांना ‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
“नवनीत राणांना आवरा, अन्यथा..”; शिंदे गटाच्या नेत्याचा थेट इशारा
IRCTC चं श्रावण स्पेशल टुर पॅकेज; ‘या’ तीर्थक्षेत्रांना स्वस्तात भेट देण्याची सुवर्णसंधी
म्हाडा लॉटरीसाठी अशाप्रकारे करा अर्ज; घरांची किंमत किती असेल?