Bajrang Sonawane | आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान झालं आहे. याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मात्र मतदानाच्या वेळीसच एक मोठी बातमी समोर आली आहे. चौथ्या टप्प्यात झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या मतदानात बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) हे थेट आता बीड येथील स्ट्राँगरूमवर धडकले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी बीडमध्ये बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक दावा केला होता. मात्र आता काही दिवसांआधी बोगस मतदान झाल्याचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत होते. यामुळे आता बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी बीडच्या बाजूला असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बनवलेल्या स्ट्राँग रूमला भेट दिली.
बजरंग सोनवणे यांनी स्ट्राँग रूमला भेट दिली :
स्ट्राँगरूमची पाहणी करण्यासाठी भेट दिली असल्याची माहिती बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी दिली आहे. बीडच्या जिल्हा पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनावर बजरंग सोनवणे यांनी आरोप केले. प्रशासनाने निवडणुकीत एकतर्फी काम केलं असल्यादा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला. बोगस मतदान केल्याच्या तक्रारी बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी कलेक्टर आणि तलाठी यांच्याकडे केली होती. मात्र त्यावर कोणीही काहीही प्रतिसाद देत नसल्याचं बजरंग सोनवणे म्हणाले आहेत.
बीडमध्ये तब्बल 70 टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान झालं आहे. यापार्श्वभूमीवर आता बीडमध्ये लोकसभा निवडणुकीची धाकधुक वाढली आहे. आता याबाबत 4 जून रोजी निकाल जाहीर होईल आणि याबाबत अधिकृत माहिती समोर येईल.
बीडमधील 19 गावांमध्ये फेरमतदान करण्याबाबत मागणी :
मतदानादिवशी मतदारांना मारहाण करणे, पोलिंग एजन्सीला गायब करणे, बीडमधील परळीत बुथ कॅप्चर करण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. यामुळे आता बजरंग सोनवणे यांनी बीडमधील 19 गावांमध्ये फेरमतदान करण्याबाबत मागणी केली आहे. यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेईल हे पाहणं गरजेचं आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहे. आता मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे हे 4 जून रोजी निकालादिवशीच समोर येईल.
News Title – Bajrang Sonawane At The EVM Strong Room
महत्त्वाच्या बातम्या
युवकाने तब्बल आठ वेळा भाजपला केलं मतदान, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतंय काय?; उद्धव ठाकरे भडकले
संकट काळात ‘याच’ गोष्टी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील!
“शाहरूख आणि करण जोहरचे माझ्या पतीसोबत होते समलैंगिक संबंध”, गायिकेचा धक्कादायक दावा
रूपाली चाकणकरांनंतर शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम कक्षाला घातला हार, गुन्हा दाखल