Bajrang Sonawane | बीडमध्ये सध्या अजित पवार गटाच्या एका नेत्याच्या ट्वीटने खळबळ उडवली आहे. बीड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. मात्र, निकालानंतर सोनवणे यांनी अजित दादांशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
आमदार अमोल मिटकरी यांनी निवडणुकीनंतर बजरंग सोनवणे पुन्हा अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.मला पदरात घ्या, असा फोन बजरंग सोनावणे यांनी अजित पवार यांना केल्याचं मिटकरी म्हणाले होते.
बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया
या दाव्यावर अखेर स्वतः सोनवणे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी हे अजित दादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? कोण आहेत अमोल मिटकरी?, असा खोचक सवाल करत बजरंग सोनवणे यांनी खडेबोल सुनावले आहेत.
“माझ्या मनात जर काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच जनता माझं तोंड चपलाने फोडेल. पवार साहेबांना सोडायचं म्हंटल्यावर माझे वडीलच मला कानसुलित मरतील.माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी परिस्थिती होईल.”, असं बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) म्हणाले आहेत.
अमोल मिटकरी यांच्या दाव्याने खळबळ
तसंच पुढे ते म्हणाले की, “काही विषय हे राजकारणाच्या पलिकडे असतात. कारखाना अडचणीत असेल किंवा चोर असेल तरी एवढा मोठा निर्णय घेणार नाही.ट्विट करण्याचा धनी किंवा त्याचा बोलविता धनी कोण आहे हे अमोल मिटकरी यांनी सांगावं.”, असं आव्हानच बाप्पा सोनवणे यांनी मिटकरी यांना दिलंय.
दरम्यान, अमोल मिटकरी यांचा ”बीडच्या बप्पाचा दादांना फोन” या चार शब्दांच्या ट्विटनंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे.राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या.अखेर स्वतः बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनीच समोर येत याबाबत स्पष्टीकरण दिलं.
News Title – Bajrang Sonawane Attack On Amol Mitkari
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी : ‘या’ जिल्ह्यातील शाळेला मनोज जरांगेंच नाव देण्यात येणार
शिंदे-पवारांचा फायदा नाही, विधानसभेला भाजप स्वबळावर लढणार?
बायको, मुलगा की अन्य; अजितदादा राज्यसभेवर कोणाला पाठवणार?
आज रंगणार भारत विरुद्ध अमेरिका थरार; कोण वरचढ ठरणार?
पंकजाताईंचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी लागला; बीडमध्ये अजूनही घडतंय बरचं काही