Beed News l लोकसभा निवडणुकीपासून बजरंग सोनावणे हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच सध्या संसदीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनावेळी देखील बजरंग सोनावणे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खासदार बजरंग सोनावणे यांनी बीड जिल्ह्यासाठी विमानतळ मंजूर करा अशी मागणी देशाच्या संसदीय अधिवेशनात दिली आहे. यावेळी त्यांनी बीड ते पुणे अंतर हे तब्बल 500 किलोमीटर असल्याचा उल्लेख केला आहे.
खा. बजरंग सोनावणे यांनी संसदेत दिली चुकीची माहिती :
बजरंग सोनावणे संसदीय अधिवेशनात बोलताना म्हणाले की, बीड जिल्ह्यासाठी विमानतळ मंजूर करा. कारण बीड मतदार संघाच्या बाजूला 130 किलोमीटरवर छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे. तसेच बाजूला लातूर हा जिल्हा आहे. या दोन्ही ठिकाणी विमानतळाची सुविधा उपलब्ध आहे, मग बीड जिल्ह्यापासून 500 किलोमीटर अंतरावर पुणे शहर आहे. मात्र पुण्यातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत मग बीड जिल्ह्यातील नागरिकांना का नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मात्र खासदार बजरंग सोनावणे यांनी भाषणात पुणे शहर हे बीड जिल्ह्यापासून 500 किलोमीटरवर आहे असा उल्लेख केला आहे. मात्र सत्यात बीड जिल्हा पुण्यापासून अवघ्या 250 किलोमीटर अंतरावर असल्याने चुकीची माहिती त्यांनी देशाच्या संसदेत दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Beed News l बीड जिल्ह्यात विमानतळ मंजूर झालं पाहिजे :
बीड जिल्ह्यात देखील विमानतळ मंजूर झाले पाहिजे. कारण विकास मुंबई आणि मोठ्या महानगरांमध्येच का? आमच्याकडेही विकास होऊ द्या? आमच्या शेतकऱ्यांचाही मोठा फायदा यामध्ये होईल अशी मागणी बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी संसदेत केली आहे.
बीड जिल्ह्यासाठी विमानतळ मंजूर करा; अशी आग्रही मागणी देशाच्या संसदेत मांडली..
माझ्या बीड मतदार संघाच्या बाजूला 130 किलोमीटरवर संभाजीनगर आहे. बाजूला लातूर आहे. त्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध आहेत. माझ्या जिल्ह्यापासून 500 कि.मी. अंतरावर पुणे शहर आहे.
इथल्या नागरिकांना ही सुविधा… pic.twitter.com/TZf3qyW4Wj
— Bajrang Sonwane (@bajrangsonwane_) August 8, 2024
News Title- Bajrang Sonawane give wrong information in Parliament
महत्वाच्या बातम्या-
निवडणुकीपूर्वी महायुतीला धक्का बसणार? ‘या’ मित्रपक्षाने दिला वेगळा होण्याचा अल्टिमेटम
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच अभिषेक बच्चनची ‘ती’ पोस्ट व्हायरल; ऐश्वर्याला सोडून चक्क..
“ज्या नागांना गेली वीस वर्षे दूध पाजले, त्या नागांनी फणा काढला”
Animal चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘तो’ डिलीटेड सीन तूफान व्हायरल!
ग्राहकांना श्रावण पावला! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव