Bajrang Sonawane | अनेकांचं लक्ष हे बीड लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. बीडमध्ये बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना शरदचंद्र पवार गटातून उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये सभेला संबोधित केलं. यावेळी बोलत असताना धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांच्या कारखान्याला कर्ज दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“अजितदादांना मुलाला निवडून आणता आलं नाही”
बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी अजितदादांना खडेबोल सुनावले आहेत. अजितदादा म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून मी मला कारनखान्याला लोन दिलं. मग अजितदादांनी त्यांना का लोन दिलं नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझ्या मुलीला पराजित करण्याचं काम हे धनंजय मुंडे यांनी केलं असल्याचा गौप्यस्फोट बजरंग सोनवणे यांनी केला. त्यावेळी बोलत असताना त्यांनी अजितदादांवर पलटवार केला. अजितदादांना स्वत:च्या मुलाला लोकसभा निवडणूक विजयी करून देता आली नाही, यामुळे आता अजितदादांनी आमची मापं काढू नये, कारण बीड जिल्ह्यातील लोक तुमची मापं काढल्याशिवाय राहणार नाहीत, असं म्हणत त्यांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
पंकजा ताईंच्या पुढे जो उमेदवार बजरंग उभा आहे ते सारखे माझ्याकडे यायचा आणि मला माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढवून देण्याबाबत मागणी करत होता. मी देत नव्हतो पण धनंजय मुंडे यांनी वाढवून द्यायला सांगितली. धनुभाऊला माणसं कळत नाही म्हणून त्याची गाडी बिघडते म्हणून तु माझा सल्ला घेत जा, असं अजित पवार म्हणाले आहेत. बजरंग सोनवणे यांना पंचायत समितीमध्ये आपल्या मुलीला निवडणूक लढवता आली नाही, असं अजित पवार म्हणाले. त्यावर सोनवणे यांनी चांगला पलटवार केला.
बंजरंगा तुझी छाती फाडू नको, छाती फाडली की हे दिसतं ते दिसतं. बजरंगा सर्व चांगलं चाललं होतं. त्याचा बार्शीला आणि बीडमध्ये कारखाना आहे. अशांच्या दोन्ही हाती पैसे आले की मस्ती येते, असं म्हणत अजितदादांनी हल्लाबोल केला.
News Title – Bajrang Sonawane Replied To Ajit Pawar At Beed Loksabha 2024
महत्त्वाच्या बातम्या
“नवनीत राणा चिप मेंटॅलिटीची बाई, कव्हरेज दिलं तर डान्सही करायला लागेल”
सलमानला विचारण्यात आला ऐश्वर्या रायबद्दलचा प्रश्न, सलमान म्हणाला…
पुण्यात राज ठाकरेंच्या सभेचा इम्पॅक्ट होणार, फतव्यामुळं मोहोळांचं पारडं जड
अजित पवारांच्या सभांनंतर नूर पालटला, राष्ट्रवादीची सगळी ताकद श्रीरंग बारणेंच्या पाठिशी!
“राज ठाकरेंना आताच एवढा पुळका का?, भाजपची राज ठाकरेंनाही धमकी?”