अजित पवार म्हणालेले ‘तुला बघतोच’, बजरंग सोनवणे म्हणाले ‘बघा मी निवडून…’

Bajrang Sonawane | बीड लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली. बीड लोकसभा मतदारसंघ हा मुंडेंचा बालेकिल्ला आहे. मात्र हा बालेकिल्ला महाविकास आघाडीने मिळवला. एक्झिट पोलनुसार पंकजा मुंडे विजयी होतील असं दाखवलं होतं. मात्र बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण 10 जागा निवडल्या होत्या. त्यामध्ये दोन जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर एकूण 8 जागांवर विजय मिळवला. आज सुप्रिया सुळे आणि निलेश लंके वगळता इतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

“पिपाणीने घात केला नाहीतर…”

विजयानंतर बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी भाजप आणि अजितदादांवर निशाणा साधला. देशात मोदींची गॅरंटी चालली नाही, मग बीडमध्ये कशी चालेल?, असा सवाल बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केला. बीड जिल्हा हा याआधी देखील शरद पवार यांचा होता. आजही शरद पवार यांचा आहे हे सिद्ध झालं असल्याचं बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) म्हणालेत. हा गड कोणाचाच नाही. पिपाणीने घात केला नाहीतर 50 ते 60 हजार मतांनी विजय मिळवला असता. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजित पवार म्हणाले होते की निवडणुकीला उभा राहू नको. पण आता काय करणार मी निवडून आलो असल्याचं बजरंग सोनवणे म्हणाले आहेत. आगामी काळात बीडमधून सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणणार, असंही बजरंग सोनवणे म्हणालेत.

अजित पवार काय म्हणाले होते?

पंकजा ताईंच्याविरोधात बंजरंग उभा आहे. तो मला सारखा मला म्हणायचा की माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढवून द्या. मी देत नव्हतो पण धनंजय मुंडे यांनी वाढवून द्यायला लावली. धनुभाऊंना माणसं कळत नाहीत. म्हणून त्यांची गाडी बिघडते. तु आता स्वत:ला हनुमान समजायला लागला होता. बजरंग सोनवणेंचा बार्शी आणि बीडमध्ये कारखाना आहे. सर्व बरं चाललं होतं. त्याला कुठून अवदसा आठवली माहिती नाही आणि निवडणुकीला उभा राहिला आहे. दोन पैसे आली की मस्ती आली, असं अजत पवार म्हणाले होते.

माझ्यासोबत एवढ्या दिवस राहिला. आता मला सोडून गेला आहे. मी एवढं सर्व देऊन तो सोडून जाऊ शकतो तो तुम्हाला किती वेळा सोडून जाऊ शकतो. अरे हा पठ्ठ्या खासदारकीला पडला. मुलीला ग्रामपंचायत तसेच नगरपालिकेला निवडून आणू शकला नाही तो खासदार बनायला निघाला आहे असं अजित पवार म्हणाले होते.

News Title – Bajrang Sonawane Slam To Ajit pawar After Loksabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

‘CISF च्या महिला जवानने माझ्या कानाखील मारली’; कंगनाचा गंभीर आरोप

“मोदी-शहांचा शेअर मार्केटमध्ये 30 लाख कोटींचा घोटाळा”; राहुल गांधींच्या आरोपांनी देशभर खळबळ

‘अजित पवारांनी गुरंढोरं सांभाळावीत’; ‘या’ नेत्याचा अजितदादांना खोचक सल्ला

अजित पवार-एकनाथ शिंदेंवर बूमरँग होणार?; मोठी माहिती समोर

“मी पुन्हा येईन…पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे आता बारा वाजलेत”