‘…नाहीतर मी स्वत:ला संपवून घेईन’; बजरंग सोनवणेंच्या वक्तव्याने खळबळ

Bajrang Sonawane | बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे या लोकसभेच्या मैदानात आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे आहेत. या निवडणुकीत बीडमध्ये चुरशीची लढत झाली आहे. येत्या 4 तारखेला निकाल स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी बीडच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत.

सोनवणेंकडून स्वत:ला संपवून घेण्याची धमकी

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना स्वत:ला संपवून घेण्याची धमकी दिली. सोनवणे यांनी निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांना धमकी दिली.

मी काय बोललो हा विषय नाही. त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली नाही तर बीड जिल्हा काय म्हणेल? त्यांनी लोकशाही जिंवत ठेवावी, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली.

निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांना मी अनेक तक्रारी केल्या होत्या. ते एकतर्फी वागतात असं माझं मत झालं आहे. कांबळे आणि पोलीस प्रशासनाचे एकमत दिसत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

स्ट्राँग रुमला येण्याचं कारण हे की, जिल्हाधिकारी इथे आहेत. त्यांच्याशी मला काही चर्चा करायची आहे. त्यामुळे मी इथे आलो आहे. त्यांनी मला काही गोष्टी विचारल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात येऊन बोलतो, असं म्हणालो. याशिवाय स्टाँग रुमच्या पाहणीसाठी इथे आलो आहे, असंही ते म्हणाले.

Bajrang Sonawane | “खासदार मीच होणार”

कौल कोणाचा, काय आहे माहीत नाही. मात्र माझा विजय निश्चित आहे. बीड जिल्ह्यातील संस्कृती आणि रसायन वेगळे आहे. खासदार मात्र मीच होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

कुठे ऊन, कुठे पाऊस; वाचा हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज

राज्यातील एक्झिट पोलवर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘अशा’ व्यक्तींना आयुष्यात कधीच यश मिळत नाही; ‘या’ सवयी आजच बदला

‘नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर…’; रवी राणांच्या वक्तव्याने खळबळ

जान्हवी कपूरने सर्वांसमोरच बॉयफ्रेंड शिखरला…. ; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल