“लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली”

Bajrang Sonawane | बीडमधील उलटफेरामुळे भाजपला जबर धक्का बसला आहे. बीड हा भाजपचा मराठवाड्यातील बालेकिल्ला होता. गोपीनाथ मुंडे यांनी हा मतदारसंघ भक्कम तटबंदीने सुरक्षित केला होता. त्याचं त्यांनी अनेकदा नेतृत्व केलं होतं. पण या गडाला सुरुंग लावण्यात बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यशस्वी ठरले. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली, असं वक्तव्य बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर टीका केलीये.

मी ज्या बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार झालो, तेथील लढाई सोपी नव्हती. अगदी सुरुवातीपासून ते प्रमाणपत्र हातात घेईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मला लढा द्यावा लागला. मात्र, आदरणीय शरद पवार साहेब (Sharad Pawar) आणि जनता माझ्यासोबत होती, असं त्यांनी सांगितलं.

“सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित हो नही सकता”

देशात सर्वात उशीरा बीडचा निकाल लागला. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित हो नही सकता, असं बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी म्हटलं आहे.

आज पक्षाने आम्हा सर्वांचा सत्कार केला. पण मी विनंती करतो की, आपली लढाई याठिकाणी थांबत नाही, इथून आपल्या खऱ्या लढाईला सुरुवात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 80 टक्के निकाल लागणारा देशातील एकमेव पक्ष आहे, असं बजरंग सोनवणे म्हणालेत.

“जनतेने देशाचा खरा नेता कोण हे दाखवून दिलं”

या निवडणुकीने आणि महाराष्ट्रातील जनतेने देशाचा खरा नेता कोण? हे दाखवून दिलं आहे. यासाठी कार्यकर्ते आणि मतदारांचे मी आभार मानतो, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण 10 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये दोन जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर एकूण 8 जागांवर विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या- 

अखेर निलेश लंकेंनी इंग्रजी बोलून दाखवलीच; सुजय विखेंना सणसणीत टोला, पाहा Video

“स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी…”, प्रितम मुंडेंची रक्षा खडसेंसाठी भावनिक पोस्ट चर्चेत

“कंगना आणि मी पती-पत्नी सारखं..”; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन!

शेतकऱ्यांनो पेरणी करण्यापुर्वी ही बातमी वाचाच!, नाहीतर बसेल मोठा फटका