Bajrang Sonawne | शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawne) यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आहे. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. अशात बजरंग सोनवणे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
माझ्या विजयामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा वाटा आहे, असं बजरंग सोनवणे (Bajrang Sonawne) यांनी म्हटलं आहे. माझ्या विजयाचं श्रेय बीड जिल्ह्याच्या जनतेला आहे, असंही ते म्हणालेत.
बजरंग सोनवणेंचा मोठा गौप्यस्फोट
जिल्ह्यातील 2 माणसांचा मी आभार मानणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा माझ्या विजयामध्ये वाटा आहे. तर आदरणीय सुरेश धस यांचा वाटा देखील आहे, असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. ते बीडच्या केज येथे बोलत होते. बजरंग सोनवणेंच्या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांना फोन केला आहे. या दोघांमध्ये फोनवर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी केला आहे.
Bajrang Sonawne | शरद पवारांच्या खासदाराचा अजितदादांना फोन?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही बजरंग सोनावणे (Bajrang Sonawne) यांचा अजितदादांना फोन आल्याचं म्हटलंय. बीडमधील एका बप्पांचा फोन अजितदादांना आला, मला वाचवा अशी विनंती त्यांनी केली. अजितदादांचा सगळ्यांना सोबत घेऊन जायचा स्वभाव आहे, त्यामुळे काही दिवसात ट्रेलर दिसेल, असं सूचक विधान अमोल मिटकरींनी केलं आहे.
लोकांना विकासकामं करायची असली तर जिंकून आल्यावर अजित पवारांची गरज लागते, साखर कारखान्यासंदर्भात विषय असल्याने त्यांचा फोन आल्याची शक्यता असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ
थकवा, हातापायाला मुंग्या येतात?, असू शकते व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता; करा ‘हा’ उपाय
“मोदी अहंकारी आहेत, ते मुस्लिमांचा द्वेष करत नाही हे त्यांनी पटवून द्यावं”
बुलढाण्यात मोठी दुर्घटना; वादळी वाऱ्यामुळे झोक्यात झोपलेली चिमुकलीही पंत्र्यांसोबत उडाली
“भारतीयांनी आळशी होऊ नये, देश अजूनही..”; कंगना रनौतचं मोठं आवाहन