अजित पवारांना अडकवण्याचा कराडचा प्लॅन?, बड्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

Bajrang Sonwane serious claim about Ajit Pawar

Bajrang Sonwane | बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास महिना उलटत आला आहे. डिसेंबर महिन्यात त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या तपासाला देखील अद्याप पूर्ण यश आलं नाही. अजूनही काही आरोपी फरार आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा गेल्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबररोजी पोलिसांना शरण आला. तो स्वतः सरेंडर झाला. मात्र, कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीमुळे आता वेगळाच वाद निर्माण झाला आहे. (Bajrang Sonwane)

अजित पवार हे मस्साजोग येथे देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा आरोप शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला होता. अशात त्यांनी कराडबाबत आणखी एक धक्कादायक आरोप केलाय. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेत हा आरोप केलाय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

बजरंग सोनावणे यांचा आरोप

बजरंग सोनावणे यांनी याप्रकरणी आता आणखी एक नवा दावा केला आहे. अजित पवार यांना अडकवण्याचा कराडचा प्लॅन असावा, असा आरोप सोनावणे यांनी केला आहे. ताफ्यात गाडी टाकून अजित दादांना अडकवण्याचा त्यांचा कट असावा, असा दावा सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना केला. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

“माझा अजित पवारांवर कुठलाही आरोप नाही. देशमुख यांचे जेवढे मारकेरी आहेत ते पकडले गेले पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि यामागचा जो मास्टरमाईंड आहे त्यालाही फाशी झाली पाहिजे, याच्यावर आमचा फोकस आहे. यातील फरार आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, ही आमची मागणी आहे”, असं बजरंग सोनावणे (Bajrang Sonwane) म्हणाले.

“माझ्याकडे फोटो आहेत, मी विनाकारण…”

“माझ्याकडे फोटो आहेत, मी विनाकारण आरोप करत नाही. अजित दादांवर माझा कोणताही आरोप नाहीये. अजित दादा 21 तारखेला आले होते, हा आरोपी ( कराड) ज्या गाडीने सरेंडर होण्यासाठी आला, त्याच गाडीचा मालक तिथे होता. मी ( या मुद्याचं) राजकारण करत नाहीये.पण देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीला जे सहकार्य करत आहेत, त्यांच्यावर माझा आरोप आहे”, असंही पुढे सोनावणे (Bajrang Sonwane) म्हणाले.

देशमुखांचे जे मारेकरी आहेत, जे या कटात आहे, त्यांना पकडा आणि फाशी द्या एवढंच माझं म्हणणं आहे, असं पुढे खासदार बजरंग सोनावणे म्हणाले. दरम्यान, कराडवर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा असून तो कारागृहात आहे. त्याला बीडमधील कोर्टाने 15 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

News Title :  Bajrang Sonwane serious claim about Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

ड्रेसिंग रुममधील चर्चेनं भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ, गौतम गंभीर म्हणाला…

सानिया मिर्झा मोहम्मद शमीला करतेय डेट?, दोघांचे स्विमिंगपूलमधले फोटो तूफान व्हायरल

रोहित शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती?, आताच्या घडीची महत्त्वाची घडामोड

कोणत्या कारच्या कंपनीला भारतात सर्वाधिक मागणी?, महत्त्वाची आकडेवारी उघड

देशमुख प्रकरण भोवलं! धनंजय मुंडेंचा पत्ता कट?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .